पोस्ट्स

जून, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Preface

इमेज
मंडळी रामराम ! हे कवितांचं पान. शाळेत असल्यापासून पाचवी सहावीतच मी कविता लिहू लागलो. एरवी अवांतर वाचनात वा अभ्यासातही मी कधी फारशी गती दाखवली नव्हती. पण मला हे अंग आहे असं पाहिल्यावर त्याला पाहिजे तसं खतपाणी घालून मला कवी पदाला पोहोचवण्याचं सगळं श्रेय माझ्या कै. सौ. आईला. मला माझ्या हुंदडण्यातून बाहेर काढून या अपार सृजनानंदाची ओळख करून देण्यासाठी तिला किती कौशल्य पणाला लावावं लागलं असेल याची आता कल्पना येते. कुठेही तिचं भाषण असलं की तिचं शेपूट म्हणून मी असायचाच. त्यावेळी अनेक गाफिल श्रोत्यांना माझ्या चिमखड्या बोलांची शिकार व्हावं लागलेलं आहे. एक कविता महाराष्ट्र टाईम्समधेही आली. पेपरमधे नाव छापून आलं म्हटल्यावर माझा भाव जबरी वाढला. पारल्याच्या भाईदास हॉलमधे एकदा खूप मागे विविध भारतीय भाषांतील कवींचं सम्मेलन होतं. मध्यंतरात मला काखोटीला मारून आई सरळ आतमधे घुसली. मग काय थेट आपल्या बापट, पाडगांवकरांपासून ते हिंदी, गुजराथी, अगदी उर्दू कवींना सुद्धा माझ्या सावरकरी पीळाच्या 'देशभक्तिपर' कविता ऐकण्याची संधी मिळाली. बहुदा निदा फाजलीही होते. मी अश्या वयात होतो की लाज, संकोच वगैरे व्यवस्...