20240525 Sat - Kavita - "Kashas dongar chadhayacha"
कशास डोंगर चढायचा? उगा कशाला त्रास जिवाला, कशास डोंगर चढायचा? खालुन कुतुहल जागत राही, अन आकर्षण उंचीचे बाल्य जवानी आणि खुणावे, स्मरणही केल्या मौजीचे अता वेडपण सोसावे का, का धोका पत्करायचा उगा कशाला त्रास जिवाला, कशास डोंगर चढायचा? लावुन जिंका स्वतःस पैजा, लढा उभारा अपुल्याशी प्राणपणाने करून चढाई, पोहोचा उच्च पदापाशी श्वासही फुलतो छाती दबते, पायही अन थरथरायचा उगा कशाला त्रास जिवाला, कशास डोंगर चढायचा? अहंकार अब्रूचा येथे, हो पाचोळा ...